भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात सदभावना दिवस साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे भुसावळ विभागात गुरुवार २० ऑगष्ट रोजी सकाळी ११ वाजता सदभावना दिवस साजरा करण्यात आला .
सर्व जाती, धर्म,भाषा ,तथा क्षेत्रचे लोकामधे राष्ट्रीय एकता राहावी यास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी सर्वाना एकत्रितपणे शपथ दिली.
या कार्यक्रमात अप्पर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा , वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे ,वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील , वरिष्ठ मंडळ इंजिनियर ( समन्वय ) राजेश चिखले , वरिष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता श्री लक्ष्मी नारायण आणि सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते . सामाजिक अंतर ठेवून व मास्क लावून हि शपथ घेण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *