मंगला एक्स्प्रेसच्या मार्गात परीवर्तन ;


भुसावळ (प्रतिनिधी)-
कोकण रेल्वेतील कारवार सेक्शनमधील मादुरे आणि पेरनेम स्टेशन दरम्यान तांत्रिक कार्यामुळे या खंडमधील परीवहन सेवा पुढील आदेश पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 02617 डाउन एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस प्रस्थान स्टेशनहुन 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान मडगाव, लोंडा, मिराज, पुणे, पनवेल, कल्याण मार्गे हजरत निजामुद्दीन स्थानकावर पोहोचणार आहे. अप 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस प्रस्थान स्टेशनहुन 20 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान पनवेल, पुणे, मिराज, लोंदा, मडगाव मार्गे एर्नाकुलम स्थानकापर्यंत जाणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *