भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे भुसावळ मंडळ येथे वाणिज्य कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतंत्रता दिनी जाहीर करण्यात आलेले कोरोना योद्धा पुरस्कार वितरित करण्यात आले. भुसावळ मंडळ येथील वाणिज्य कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळामध्ये निष्ठापूर्वक आणि उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल त्यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये वाणिज्य विभागातील १४ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मंडळ वाणिज्य प्रबंधक बी अरुण कुमार , सहायक वाणिज्य प्रबंधक ( टी .जा ) अनिल पाठक , सहायक वाणिज्य प्रबंधक ( माल ) अनिल बागले हे उपस्थित होते . त्यामधे मुख्य वाणिज्य निरीशक एन के शर्मा, मिलिंद ठिगले, प्रकाश ठाकुर, मुख्य वाणिज्य निरीशक( खानपान ) किरण ठाकुर, मुख्य पार्सल पर्यवेक्षक आर पी सपकाले, उदय कपोते .वाणिज्यनिरीक्षक नितिन राठोड, निलेश बातो,कुवर प्रभात , सुबोध कुमार , केशव चौधरी , आणि अनिल जेठ्वे , रवि वानखेड़े यांना प्रदान केले गेले .



