गोवा एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोकण रेल्वेच्यावतीने काही गाड्यांमधे परीवर्तन करण्यात आले आहे. 02780 अप हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस ही प्रस्थान स्थानकापासून 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान हुबली स्टेशनपर्यंत शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. ही गाडी लोंडा ते मडगांवपर्यंत रद्द राहणार आहे. डाऊन 02779 मडगांव-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस 23 ऑगस्ट ते 10 सप्टेबर दरम्यान हुबली स्टेशनवरून सुटणार आहे तर मडगांव ते लोंडा दरम्यान ही गाडी रद्द राहणार आहे. बदलाची रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *