भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ रेल्वे विभागात 200 कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतंत्रता दिनी जाहीर करण्यात आलेले कोरोना योद्धा पुरस्कार 18 ऑगष्ट मंगळवार रोजी वितरित करण्यात आले. भुसावळ मंडळ येथील कर्मचाऱ्यांनी कोरोना संक्रमण काळामध्ये निष्ठापूर्वक आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक एन डी गांगुर्डे. वरिष्ठ कार्मिक अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .
यामध्ये कार्मिक,यांत्रिक, चिकित्सा, सुरक्षा, सिग्नल आणि दूरसंचार इत्यादी विभागातील 200 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.
ह्या कार्यक्रमासाठी आर एच परदेसी ए पी ओ (डब्लू), बी एस रामटेके ए पी ओ(एम) तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्मिक विभागाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



