भुसावळ (प्रतिनिधी )-
रोटरी क्लब ऑफ भुसावळ यांच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी रोटरी क्लब सदस्याच्या वाढदिवसानिमित्त त्या सदस्याच्या घराच्या परिसरात त्यांच्या हातून वृक्षारोपण करण्याचा आगळावेगळा उपक्रम रोटरीचे अध्यक्ष रोटेरियन गजानन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे . या अंतर्गत 18 ऑगष्ट मंगळवार रोजी रोटरी सदस्य रोटेरियन गोपाल तिवारी यांच्या हस्ते त्यांच्या राहत्या घरी पुरुषोत्तम नगरमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ भुसावळचे प्रेसिडेंट रोटेरियन.गजानन ठाकूर, पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन राजेश अग्रवाल, महेश भराडे, रोटेरियन राधे शाम लाहोटी, संजय अग्रवाल, विकास कात्यायानी, द्वारका दास हेडा, मदन बोरकर, नगरसेवक रोटेरियन बोधराज चौधरी, मनोज गुलाईकर इत्यादी उपस्थित होते.



