भुसावळ (प्रतिनिधी)-
शहरातील जामनेर या मुख्य रस्त्यावरील चोकअप झालेल्या उघड्या गटारी व ड्रेनेजचे काम नगरपरिषदेने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्या तक्रारीवरून काही दिवसांपुर्वी हाती घेतले होते.मात्र ते काम न करता ते खोदुन ठेवल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. उघड्या असणाऱ्या गटारीमुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात होता ,यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी याविषयीही नगरपरिषदे मध्ये वेळोवेळी आवाज उठवूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.सद्ध्या या उघड्या असणाऱ्या या ड्रेनेज,गटारी मध्ये भोपळा विसर्जन करून धांडे यांनी आंदोलनही केले होते, परंतु नगरपरिषदेने रस्त्यातील गटार बंद करण्याचे काम अद्यापही केले नव्हते ,भुसावळ नगरपरिषदेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना उघड्या गटारी व चोकअप बाबत माहिती देण्यात आली.तात्काळ मुख्याधिकार्यांनी या ठिकाणाची पाहणी करून आठ दिवसाच्या आत गटारीची दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.



