भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील श्री गाडगेबाबा हायस्कूल व प्राथमिक विद्या मंदिर भुसावळ येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा वर्धापन दिन दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी सात वाजता साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या नियमांचे पालन करून शालेय समिती चेअरमन धर्मराज राघो पाचोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापक अरूण धनपाल यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



