भुसावळ (प्रतिनिधी )-
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.त्यामुळेच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण पुरक गणेशमुर्ती घरी तयार करून त्याच मुर्तीची स्थापना करावी या उद्देशाने अंतर्नादने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
“शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या “
सदरील कार्यशाळा दिनांक १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतर्नादच्या फेसबुक पेज वर आणि झूम एपला ऑनलाईन होणार आहे.प्रशिक्षक म्हणून रमाकांत भालेराव असणार आहे.उत्कृष्ट मूर्ती बनवणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या ५ व्यक्तिना रोख रक्कम, प्रमाणपत्र व व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.दिनांक २१ ऑगस्ट २०२० पर्यंत मूर्ती बनवतांनाचा एक आणि रंगवून झाल्यानंतर एक असे दोन फोटो, नाव, वय आणि शहर, संपर्क क्रमांक 9421741824 ह्या नंबरला व्हाट्स अप करावयाचे आहे.या लाईव्ह कार्यशाळेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यानी वेळेपूर्वीच शाळू माती भिजवून तयार ठेवावयाची आहे असे आयोजकांनी कळवले आहे.
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर घुले, तर प्रकल्प समन्वयक म्हणून
प्रमोद पाटील, आणि प्रकल्प सह समन्वयक म्हणून सचिन पाटील हे असणार आहे.या उपक्रमाच्यासमितीत सदस्य म्हणून
योगेश इंगळे ,प्रदिप सोनवणे,जीवन महाजन ,देव सरकटे ,जिवन सपकाळे ,विक्रांत चौधरी ,हरीश कोल्हे ,मिलिंद कोल्हे ,अमित चौधरी ,समाधान जाधव ,संदिप सपकाळे ,राजू वारके हे असणार आहे.यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.



