लोकशाहीला कॅश, कास्ट आणि क्राईम हे लागलेले ग्रहण – अरुणभाई गुजराथी


भुसावळ (प्रतिनििधी ) –
भारत देशाची लोकशाही ही सर्वात बळकट अशी लोकशाही असून यामध्ये हे सर्वांनाच सामावून घेतलेले आहे संविधानाने दिलेल्या मुलभूत हे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळाल्याने मुक्तपणे वावर करू शकतो परंतु कॅश कास्ट आणि क्राईम हे लोकशाहीला लागलेले ग्रहण असून यापासून लवकर मुक्त होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले

रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्यावतीने द्वंद जीवनाचे या ऑनलाईन व्याख्यानमालेत शिक्षणातून सामाजिक बांधिलकी जपत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक करताना रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे यांनी आतापर्यंत झालेले सहा पुष्पं गुंफले असून एकवीस हजारापेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन पाहिले आहे श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने ही व्याख्यांमला पुढे सुरू ठेवत आहे तर अरुण भाई गुजराथी यांचा परिचय सुनील वानखेडे यांनी करून दिला

यावेळी बोलताना अरुण भाई गुजराथी म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपली लोकशाही ही चार खांबांवर ती मजबूतपणे उभी आहे यामध्ये संसद प्रशासन पत्रकारिता व न्यायालय हे चार खांब असून यामुळे लोकशाहीला बाधा अद्याप तरी नाही संसद या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही ही संसदेमध्ये हे समान अधिकार असून दोघांमध्ये संवाद घडणे गरजेचे आहे आपले सरकार सीआर, जीआर, व एफआयआर यावर चालते प्रत्येक घटक त्याची त्याची भूमिका चांगल्या पद्धतीने निभावत असून यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे काम हे संसदेचे असून ते पूर्ण करण्यासाठी विधानसभा पूर्णवेळ चालली पाहिजे लोकशाहीला कॅश कास्ट व क्राईम हे लागलेले ग्रहण असून ते ग्रहण सुटले पाहिजे अन्यथा लोकशाहीला बाधा निर्माण होऊ शकते लोकशाहीमध्ये मतदार यांची भूमिका महत्त्वची असून त्यांनी योग्य भूमिका बजावणे गरजेचे आहे

उद्याच्या लोकशाहीमध्ये व्यक्तिमत्व विकास चारित्र्य एज्युकेशन या गोष्टींना महत्त्व येणार असून वन नेशन वन रेशन, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्सेशन अशी भूमिका येऊ शकते लोकप्रतिनिधींना सोशल मीडियाचा वापर करून निवडणुका लढणे व कामकाजाची पद्धत शिकावी लागणार आहे भविष्यात वर्क फ्रॉम होम होऊन अधिवेशनावर होणारा लाखो रुपये खर्च टाळू शकतो तर माहिती व तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार देखील कमी होऊ शकतो गुन्हेगारी बाबत बोलताना ते म्हणाले की उमेदवारीसाठी वयाची अट उघडा इतर कोणतेही निकष नाही परंतु यामध्ये बदल होऊन ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांच्यासाठी कायदा बदलण्याची गरज आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅलीचे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी तर आभार प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेक्रेटरी राम पंजाबी प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे व कोऑर्डिनेटर जीवन महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *