भुसावळ( प्रतिनिधी)-
१५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७४ व्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यानिमित्त दावते इस्लामी हिंद तर्फे खडका रोडवरील अयान टॉवर हॉलमध्ये जश्न आजादी कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात संस्थेचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात देश प्रेमावर आधारित विविध गिते सादर करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण जगात व भारतात शांतता व समृद्धी आणि कोरोना रोग निर्मूलनासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली
.या कार्यक्रमास सय्यद इम्रान,शफीक शेख,आसिफ अतारी,अझर कादरी,शेख शोएब,सईद शेख, वाहिद अत्तारी,हाफिज मुंतझीर,रफिक कादरी,मिडीया विभागाचे रफीक रोशन शेख उपस्थित होते.



