भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळ पालिकेची तब्बल चार महिन्यानंतर स्थायी समितीची सभा गुरुवार, ६ रोजी ऑनलाईन पार पडली.
सत्ताधारी नगरसेवकांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवत शहर विकासाच्या ९१ विषयांना मंजुरी दिली असल्याची माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. ऑनलाईन सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते.
जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मर रीवाईंडींग व दुरुस्ती, प्रभाग क्रमांक एकमध्ये वृद्धांना बसण्यासाठी बाके लावणे, प्रभाग क्रमांक एकमध्ये ओपन स्पेसमध्ये खेळणी लावणे, चिंतामणी विहाराच्या रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉक बसवणे, प्रभाग दोनमधील डॉ.आंबेडकर नगरातील सामाजिक सभागृहाची दुरुस्ती करणे, आरपीडी रस्त्यावर प्रवेशद्वार उभारणे, डेलि बाजारात महिला व पुरूषांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी, प्रभाग १२ मधील नर्सरी नाल्यावर पूल बांधणे, प्रभाग १३मधील गडकरी हॉस्टेलजवळील बगीत लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी लावणे, जलशुद्धीकरण केंद्रातील भिंतीची दुरुस्ती, नगरपरीषदेसाठी जनरेटर खरेदी यासह विविध भागात पेव्हर ब्लॉक, गटारींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. दुपारी १२ वाजता सुरू झालेली सभा जवळपास अर्धा तास चालली असे नगराध्यक्ष म्हणाले.



