
भुसावळ (प्रतिनिधी )-
अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन उत्सवानिमित्त ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व रा स्व संघ सरसंघचालक मोहन भागवत व संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत असलेल्या भूमिपूजन सोहळ्याचा आनंदोत्सव शहराच्या प्रमुख चौका-चौकात कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळून प्रतिमा पूजन कार्यक्रम संपन्न झाला .यानिमित्त घरोघरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आरती व प्रतिमा पूजन केले . तर प्रभू श्रीराम मंदिरात आरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते,
याठिकाणी आनंदोत्सव जल्लोषात विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ,बजरंग दल, विविध हिंदुत्ववादी संघटना व पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात श्रीराम प्रतिमेचे आरती व पूजन कार्यक्रम मोठा जल्लोष करून उत्साहात साजरा केला.
भुमी पूजनाच्या मुहूर्तावर गुढीचे पुजन*
येथील म्युनिसीपल पार्क मधील श्रीराम मंदीरात आ.संजय सावकारे,नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शासनाचे सर्व नियम पाळून सोशल डीस्टनसिंग ठेवत प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले व राम मंदीर भूमी पूजन मुहूर्तावर उभारण्यात आलेल्या गुढीचे पूजन केले. यावेळी भाजप शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, परीक्षित बऱ्हाटे,देवा वाणी,अजय भोळे आदी उपस्थित होते.
भुसावळात राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी साकरल्या भव्य रांगोळी व फटाकयांची आतशबाजी ; पेढ़े वाटून जल्लोष ;
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला . यानिमित्त भुसावळ येथे सुद्धा नागरिकांसह शिवसैनिकांसह भाजप पदाधिकारी यांनी फटाकयांची आतिशबाजी करून ठिकठिकाणी प्रतिमा पूजन करुन पेढ़े वाटून आनंदोत्सव साजरा केला .
राममंदिर भूमिपूजना निमित्त शहरात दिवे लावून रोषणाई करण्यात आली . येथील विठ्ठल मंदिर वार्ड , येथे विठ्ठल मंदिरात कलाकार रचना रमेश महाजन हीने सुमारे 5 तासात 3 फ़ुट बाय x 4 फूट अशी श्रीरामाची प्रतिकृती असलेली भव्य सुंदर व सुबक रांगोळी काढली .

श्रीराममंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर भुसावळ शहरातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक डॉ. सुनील नेवे सर यांच्या अटल प्रतिष्ठान समोर अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिराची भावी वास्तू व प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य आणि दिव्य प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली .14 तासांच्या अथक परिश्रमातून नेवे कुटुंबियांनी अतिशय सुंदर कलाकृति साकारली आहे.


