यूपीएससी उत्तीर्ण कांतीलाल पाटिल यांचा भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधि )-
वरणगाव जवळील तपत कठोरा येथील प्रगतिशील शेतकरी तथा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या तालुका संघटक ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष बळीराम पाटील यांचा मुलगा कांतीलाल सुभाष पाटील यांनी यूपीएससी परीक्षा देऊन अथक परिश्रम करून पंचक्रोशीत गावासह आई वडिलांचे नाव उज्वल केले त्याबद्दल त्यांचा भुसावळ तालुका शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या परिसरातील शेतकरी कुटुंबातील मुलाने यूपीएससी परीक्षेत यश संपादन केल्याने भुसावळ तालुक्याचा सन्मान म्हणून तालुका शिवसेनेने आनंदोत्सव साजरा केला प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन जिल्हा संघटक विलास मुळे उपजिल्हा संघटक अल्पसंख्यांक आघाडी सईद मुल्लाजी राहुल बावणे ,अतुल पाटील ,सुभाष पाटील ,सुभाष चौधरी, सुरेश चौधरी ,यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती त्याच वेळी वरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भोये यांचेसह त्यांचा स्टाफ देखील उपस्थित होता त्यांनीदेखील कांतीलाल पाटील यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *