भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील बियाणी एज्युकेशन गृपच्या संचालिका संगिता मनोज बियाणी यांना नुकतीच जगदीशप्रसाद झाबरमल टिबडेवाला विश्वविदयालय,झुंझनू ,राजस्थान मार्फत वाणिज्य विषयावर शोध प्रबंध सादर केल्याने पीएचडीची पदवी प्राप्त झाली आहे. या यशिबद्दल त्यांचे बियाणी गृपचे अध्यक्ष मनोज बियाणी, कांताबाई बियाणी,विनोद बियाणी, स्मिता बियाणी,प्राचार्य डी.एम.पाटील,कांचन जोशी, सोफीया फ्रॉन्सीस,राजू पारीख,गोपाल ठाकूर,प्रविण भराडिया,मनोज माहेश्वरी,संजय लाहोटी,रोनक बियाणी,डॉ.मुस्कान बियाणी,पियुष बियाणी,खुशी बियाणी आदींनी अभिनंदन केले आहे.



