भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या सिनीअर डिसीएम अर्थात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधकपदी युवराज पाटील यांनी पदभार स्विकारला आहे. युवराज पाटील हे २०११ च्या भारतीय रेल्वे वाहतुक सेवेच्या (आयआरटीएस)तुकडीचे अधिकारी आहेत.यापुर्वी त्यांनी क्षेत्रीय प्रबंधक म्हणून धनबाद मंडळ (झारखंड),मंडळ परिचालन प्रबंधक मुगलसराय , मंडळ वाणिज्य प्रबंधक मुंबई , मंडळ परिचालन प्रबंधक म्हणून मुंबई,मध्य रेल्वे मुंबई मुख्यालयात वरिष्ठ वाहतूक प्रबंधक(सर्वे)म्हणून कार्य केले आहे.
आता पदोन्नतीवर त्यांची भुसावळ मंडळात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक म्हणून नियुक्ती झाली आहे . आर.के.शर्मा यांच्या भुसावळ मंडळात वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक पदावर बदलीने रिक्त जागेवर ही नियुक्ती झाली असून श्री.शर्मा यांनी नवीन पदभार स्वीकारला आहे.



