भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील खडका रोड भागातील उर्दु एज्युकेशन सोसायटी संचलित बी.झेड.उर्दु हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९१ टक्के लागला आहे. यात ९३.६० टक्के गुण मिळवून सैय्यद रजा सैय्यद अन्वर प्रथम,९१.२० मोईन खान याकुब खान व्दितीय,मुनव्वर खान जव्वाद खान आणि अहेतेशाम खान युनूस खान हे दोघंही ९१ टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय ठरले.शेख अहफाज जावेद ९०.८० व शेख यासीर अब्दुल रहीम या विद्यार्थ्याला ९० टक्के गुण मिळाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष हाजी आशिक खान,प्राचार्य तबस्सुम निगार यांच्यासह पदाधिकारी व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.



