(प्रतिनिधी )-
येथील आशिया महामार्गासह परिसरात अपघात झाल्यास अत्याधुनिक सुविधांसह रूग्णालय व वेळेअभावी अनेक अपघात ग्रस्तांना आपला जीव गमवावा लागतो.रोटरीच्या स्तुत्य उपक्रमामुळे भविष्यात सर्व गरजूंना लाभ मिळणार आहे.ग्रामीण रूग्णालयासाठी आमदार निधीतून स्वयंचलित स्वच्छता यंत्र देणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.ते आज दि.२९ जुलै बुधवार रोजी भुसावळ ग्रामीण रूग्णालयात रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली व रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेलसिटीच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणालीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे होते. याप्रसंगी आ.संजय सावकारे पुढे म्हणाले कि,रोटरीने रूग्णालयासाठी पुन्हा टेबल व खुर्च्या उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.रूग्णालयातील तीन कक्षात लावण्यात आलेल्या सुमारे दोन लाख खर्चाच्या चाळीस खाटांच्या कायमस्वरूपी मध्यवर्ती ऑक्सिजन प्रणालीचे आ.सावकारे व जिल्हाधिकारी राऊत व माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.जिल्हाधिकारी राऊत म्हणाले कि, माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली व रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही प्रणाली स्थापित करण्यात आल्याचा आनंद आहे.ग्रामीण रुग्णालयाला वॉल कंपाउंड़ व ग्रील करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी कार्यक्रमात बोलतांना वैद्यकीय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी रूग्णालयाची माहिती दिली.राजीव शर्मा यांनी रोटरी बद्दल माहिती देतांना जिल्हाधिकारी राऊत यांना विनंती केली की,ग्रामीण रुग्णालयात ब्लड बँक,प्लाज्मा बँक आणि डायलेसीस सेंटर उभे करण्यासाठी शासकीय परवानगी मिळाल्यास रोटरी फाऊंडेशनच्या माध्यमातून उभे करता येईल.या साठी १ कोटीचा निधी उभा करू व आ.संजय सावकारे यांच्या मातोश्री श्रीमती सुशिला वामन सावकारे यांनी आॅक्सीजन प्रणालीच्या कामासाठी १ लाखाची मदत देऊन मोलाचा वाटा उचलल्याचे सांगितले. यावेळी प्रांत रामसिंग सुलाने,उप जिल्हाधिकारी किरण सावंत पाटील,तहसिलदार दिपक धिवरे,गटविकास अधिकारी विलास भाटकर,सा.बां.विभागाचे अभियंता एस.यु.कुरेशी,तलाठी एम.एल.रत्नानी,मुकेश अग्रवाल,सोनु मांडे,सागर वाघोदे,आशिष अग्रवाल,मनोज सोनार,गोपाळ सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जीवन महाजन यांनी केले.आभार प्रदर्शन हॉस्पिटल तर्फे ज्योती गुरव व रोटरी तर्फे सोनू मांडे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष सुधाकर सनांसे, सचिव संजय भटकर,रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष संदीप जोशी, सचिव विशाल शहा व दोन्ही क्लबच्या सदस्यांनी व रूग्णालय कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.



