जळगाव मनपा उपायुक्तपदी किरण देशमुख ;


जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या उपायुक्तपदाचा पदभार जिल्हा प्रशासन अधिकारी किरण देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्याबाबत आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शनिवारी काढले आहेत तसेच महानगरपालिकेच्या समन्वय अधिकारीपदी महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव महानगरपालिकेत तीन उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली होती. टप्प्याटप्याने तिनही आयुक्तांची बदली इतर ठिकाणी झालेली आहे. सध्या महापालिकेत एकही उपायुक्त उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा अतिरीक्त कार्यभार इतर अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, पुढील आदेश असेपर्यंत हा पदभार संबंधित अधिकार्‍यांकडे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *