जळगाव –
जिल्हाधिकार्यांनी जळगाव शहरासह भुसावळ व अमळनेर या या शहरातील ‘नो व्हेईकल झोन’ सोमवारपासून हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. एकाच मार्गावर नागरीकांची होत असलेली गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे आदेश शनिवारी जिल्हाधिकार्यांनी काढले आहेत. यामुळे नागरीकांना जळगावसह भुसावळ व अमळनेर शहरातील विविध भागात मुक्तपणे संचार करता येणार आहे. नागरी जीवन पूर्वपदावर येण्यास यामुळे सुरुवात मदत होणार आहे. दरम्यान, नो व्हेईकल झोनमध्ये पत्रे लावून रस्ते अडविले गेल्याने नागरीकांसह व्यापार्यांनाही मोठा त्रास सोसावा लागत होता.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक १४ मार्च
२०२० अन्वये करोना विषाणू (कोव्हिड -१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ हा लागू करण्यात आला आहे.
जळगांव सह अमळनेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जळगांव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात दिनांक ७ जुलै, २०२० चे सकाळी ५ वाजेपासून ते दिनांक १३ जुलै, २०२० चे रात्री १२ वाजेपावेतो लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. १४ जुलै २०२० रोजी सदर लॉकडाऊन कालावधी संपुष्टात आल्यानंतर नागरिकांची एकदम होणारी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने तसेच टप्याटप्याने गर्दीच्या ठिकाणी वाहनांची व नागरिकांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टिने कार्यालयाचे आदेश दिनांक १४ जुलै, २०२० अन्वये जळगांव शहर महानरगपालिका, अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेइकल झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेला होता
परन्तु आता जळगांव शहर महानरगपालिका, अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका हद्दीतील गर्दीच्या ठिकाणी ‘नो व्हेइकल झोन’ ठेवण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घोषित केले असून दिनांक २७ जुलै, २०२० पासून जळगांव शहर महानरगपालिका, अमळनेर नगरपालिका व भुसावळ नगरपालिका हद्दीतील
गर्दीच्या ठिकाणी घोषित करण्यात आलेले ‘नो व्हेइकल झोन’ रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे .



