भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील सिंधी कॉलनी येथे आदर्श हायस्कूल येथे कोरोना तपासणी शिबीर बुधवार दिनांक 22 जुलै 2020 रोजी घेण्यात आले . यावेळी ५२ रुग्णांच्या स्वॅबचे नमुने
संकलन करण्यात आले .
शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 2 वाजे दरम्यान उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने व उप जिल्हाधिकारी भुसावळ शहर किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या शिबिरात 52 रुग्णांचे सँब नमुने संकलित करण्यात आले. या कामी नोडल अधिकारी म्हणुन अॅड. तृप्ती भामरे, डॉ तौसीफ खान, लॅब टेक्नीशियन लोखंडे, परिचारिका रेखा जाधव, पूनम इंगळे, लता गव्हाळे, नंदकिशोर भावसार, सचिन पवार, एन. जे. चौधरी, तसेच नगर परिषद चे पथक प्रमुख संजय बाणाईत, पंकज पन्हाळे, विशाल पाटील, शेख परवेज अहमद, अनिल मनवाडे, गोपाळ पाली, तसेच सामाजिक कार्यकर्ते निकि बतरा हे उपस्थित होते.



