मध्य रेल्वेत अनेक ठिकाणी पुलांचे पुनर्निर्माण वाढ

 


  भुसावळ (प्रतिनिधी )
लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून मध्य रेल्वेने पुलांच्या पायाभूत सुविधांची महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली.  केलेल्या  कामांचे प्रमाण पाहता अनेक ट्रॅफीक ब्लॉक्सची   आवश्यकता भासली असती आणि सामान्य काळात, चालणार्‍या काही गाड्यांवर त्याचा  परिणाम झाला देखील असता.
 
 मध्य रेल्वेच्या ३३ ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याच्या क्षमता वाढीसाठी जलवाहिनी वाढविण्यासह पुलांच्या पुनर्बांधणीचे काम लॉकडाऊन दरम्यान करण्यात आले.या ३३ पुनर्बांधणी वाढविलेल्या पुलांच्या कामांपैकी मुंबई विभागात ६,भुसावळ विभागात ४,नागपूर विभागात ३,पुणे विभागात ९ आणि सोलापूर विभागात ११ कामे झाली.
  यात मुंबई विभागातील 
कल्याण व शहड स्थानकांदरम्यान वालधुनी नदी पुलावरील दोन्ही अप आणि डाऊन मार्गावर जीर्ण झालेल्या स्टील गर्डरच्या जागी प्री-स्ट्रेस्ड काॅक्रीट स्लॅबसह बदलण्यात आले.पनवेल-कर्जत खंडावर रीइनफोर्सड सिमेंट काँक्रीट बॉक्स टाकून पुलाचे पुनर्निर्माण ४ दिवसात पूर्ण करण्यात आले.यासाठी  सामान्य वाहतूकीच्या परिस्थितीत किमान २० दिवस लागले असते.
वडाळा स्थानकाजवळील रावळी येथे आरसीसी बॉक्स टाकून गटाराची क्षमता वाढविण्यात आली.टिळक नगर स्थानकाजवळील पुल येथे आरसीसी बॉक्स टाकून अतिरिक्त जलवाहिनी तयार करण्यात आला.कसारा यार्डातील सूक्ष्म बोगद्याद्वारे ड्रेनेज क्षमता वाढविण्यासह जुन्या पुलाचे पुनर्निर्माण करण्यात आले. 
 
        नागपूर विभागात आमला-नागपूर खंडावरील दोन जीर्ण पुलांचे स्टील गर्डर  बदलून पीएससी स्लॅबस्ने टाकण्यात आला.आरसीसी बॉक्ससह अमरावती-नरखेड खंडावरील  एका पुलाचे पुनर्वसन करण्यात आले. 
      भुसावळ विभागातील इगतपुरी -भुसावळ खंडावर आरसीसी बॉक्सचा समावेश  करुन ४ पुलांचे पुनर्निर्माण,
 सोलापूर विभागातील ११ पुलांच्या ठिकाणी आरसीसी बॉक्ससह पुलांचे पुनर्निर्माण करण्यात आले. 
 पुणे विभागातील विविध  ठिकाणी आरसीसी बॉक्सद्वारे ५ पुलांचे पुनर्वसन करण्यात आले.    मिरज-कोल्हापूर खंडावरील दोन पुल आणि पुणे-मिरज खंडावरील दोन पुलांचे  जीर्ण स्टील गर्डर बदलून पीएससी स्लॅब टाकण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *