भुसावळ ( प्रतिनिधी ) –
भुसावळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने ७ ते १३ जुलै दरम्यान लॉकडाऊन वाढवले आहे यामुळे भुसावळ शहर व तालुक्यात पोलिसांना अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारी डोकेवर काढू लागली आहे
शहरात गेल्या आठवडयापासुन पोलिसांनी धाडसत्र सुरु केलेआहे .यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा व बाजारपेठ तसेच शहर पोलिसानी गोपणीय माहितीवरुन गावठी कट्टे व जिवंत काङतुसासह अनेक आरोपीना अटक केली आहे .
याच अनुषंगाने सुरु असलेल्या या धाडसत्रात शनिवारी रात्री जळगाव स्थानिक गुन्हा शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस यांच्या पथकाने कारवाई करून गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसासह एका आरोपीस ताब्यात घेतले आहे .
तालुक्यातील खडका परिसरात एक संशयित आरोपी गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हा शाखा व बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस यांच्या पथकाने छापा टाकून एका आरोपीस अटक केली आहे.
खडका परिसरामध्ये एका जवळ गावठी कट्टा असून तो परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहा. फौजदार राजेंद्र पाटील , पो. हे.कॉ. कमलाकर बागुल, रवींद्र पाटील, इद्रीस पठाण, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी शनिवार ११ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता कारवाई केली.
यात संशयित आरोपी रोशन भीमराव सपकाळे ( रा. खडका ) खडका- किन्ही रस्त्यावर पाण्याच्या टाकीजवळ अटक केली असून त्यांची अंगझड़ती घेतली असता चार जिवंत काडतुस व एक गावठी पिस्टल आढळून आली . आरोपीस तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून आर्म अँक्ट कलम ३/२५ भादवी कलम १८८ मुंबई पोलिस अँक्ट १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .



