भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील टिंबर मार्केटजवळ शुक्रवार रोजी दुपारी आकाश गणेश राजपूत (नारायण नगर, भुसावळ) याच्या ताब्यातून शुक्रवारी जळगाव गुन्हे शाखेने दोन गावठी कट्टे जप्त केले होते. आरोपीला शनिवारी भुसावळ न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शहरातील नारायण नगर भागातील संशयीत आकाशकडे गावठी कट्टा असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारी सापळा रचून आकाशला टिंबर मार्केट परीसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पकडले होते. आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल जप्त करण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपीने हे पिस्तूल नेमके कुणाकडून आणले त्याचा शस्त्र बाळगण्याचा उद्देश काय , या प्रकरणात अजून इतर कुणाचा सहभाग आहे का आदीं माहिती आरोपी कडून कळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले
अधिक तपास बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश बाविस्कर करीत आहेत.



