भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील फेकरी शिवारातील भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगवान सावळे नगर,झेडटीसी मधील सोमा काशीनाथ भटकर हा आज दि.१२ जुलै रविवार रोजी देशी व विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करीत असतांना त्यास पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून देशी व विदेशी दारूच्या १२ हजार ४७२ रू.किमतीचा ११८ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,सपोनि.अमोल पवार,पोहेकॉ.विठ्ठल फुसे,युनूस इब्राहिम शेख,अर्चना अहिरे, शिवाजी खंडारे,प्रेमचंद सपकाळे व मजीद पठाण यांनी केली.



