भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुन पर्यंत कोरोना नियंत्रित करण्यासाठी लाॅकडाऊन घोषित केले असून उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी तथा भुमी संपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई केली .
यात अरिहंत प्रोव्हीजन आनंद नगर,बिलाल किराणा मोहम्मदिया नगर,आर.आर.एंटरप्रायजेस पुजा काॅम्प्लेक्स जवळ,मधु डेअरी विठ्ठल मंदीर वार्ड,इंदौर गॅरेज जामनेर रोड या दुकानांसह मास्क न लावता फिरणा-यांविरूध्द दंडात्मक कारवाई करून ५६ हजार ५०० रू.दंड वसुल केला.

या पथकात संजय बनाईते,पंकज पन्हाळे,परवेज शेख,सुरज नारखेडे,चेतन पाटील,विशाल पाटील,किरण मनवाडे,अनिल मनवाडे,राजेश पाटील,गोपाल पाली,योगेश वाणी,स्वप्निल भोळे,मयुर भोई,पोलीस कर्मचारी पोकाॅ.दिपक शिंदे,पोकाॅ.चारूदत्त पाटील,पोकाॅ.किशोर पाटील यांनी केली.


