राजगृहावर दगडफेक करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा–रिपाईची मागणी


भुसावळ (प्रतिनिधी )-
मुंबई येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेल्‍या राजगृहावर दगडफेक करून जातीयवाद निर्माण करणाऱ्या माथेफिरूवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी आज दि.११ जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे भुसावळ येथील नायब तहसीलदार यांना मागण्‍यांचे निवेदन देण्यात आले.
राजगृहावर दगडफेक करणे हे नियोजित कट असल्याचा संशय वाटत आहे.कारण एक व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये येतो व तो संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसांना सापडत नाही याच्या मागे कुणी तरी मोठी शक्ती याला पाठबळ देत आहे.लपवून ठेवले हे देखील पोलिसांनी शोधले पाहिजे. एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देशभर दहशत पसरली आहे.सर्व कोरोनाला लढा देत असून सर्वांचे लक्ष कोरोनाकडे आहे. अशा परिस्थितीत हे कृत्य करणे म्हणजे नियोजित व संशयास्‍पद आहे.जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न केला असून गंभीर बाब आहे.आमचे आधार स्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास्थानात तोडफोड करून संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहे.राजगृह हे आमचे आदरस्थान आहे.आरोपीला शोधण्यास सरकार व पोलीस अपयशी ठरलेले आहे म्हणून आरोपीस लवकरात-लवकर शोधून मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी हे निवेदन देण्यात आले.यावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे,जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी,युवा जिल्हाध्यक्ष रवी सपकाळे, जिल्हा सचिव गिरीश तायडे,उप तालुकाध्यक्ष राहुल बिऱ्हाडे,बाळू सोनवणे,लक्ष्मण जाधव,पप्पू सुरळकर यांच्या सह्‍या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *