राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे जाहीर निषेध ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची तोडफोड या घटनेचा येथील राष्ट्रीय दलित पॅंथर तर्फे जाहीर निषेध करण्यात आला असून यातील दोषीना कठोर शासन व्हावे अशी मागणी करण्यात येवून ८जुलै रोजी निवेदन देण्यात आले .
दादर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाची काही समाज कंटकांनी नासधूस करून सामानाची तोडफोड केली व यामागील सुत्रधार कोण यांची देखील उच्चस्तरीय चौकशी करून त्या समाज कंटकास कठोर शासन करण्यात यावे तसेच राजभवनाला कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे जिल्हा प्रमुख सुदाम सोनवणे युवा जिल्हा प्रमुख आलकंश मोरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *