डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञात माथेफिरू कडून तोडफोड, पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावावा अन्यथा महाराष्ट्रभर उद्रेक होईल – कामगार नेते जगन सोनवणे;


भुसावळ (प्रतिनिधी )-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरूकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राजगृहावर हल्ला करणारे पोलीसांनी तात्काळ अटक करावी अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होऊन कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्यासाठी हे कटकारस्थान असल्याचे कामगार नेते जगन सोनवणे ह्यांनी सांगितले आहे. 
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.त्यामध्ये आरोपी दिसत आहे. हा महाराष्ट्र पेटविण्याचा नियोजित डाव असून पोलीसांनी तात्काळ आरोपींना जेरबंद करण्याची मागणी भुसावळ शहर पोलिस निरिक्षक बाबासाहेब ठोबे  तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना निवेदन द्वारे  कामगार नेते जगन सोनवणे यांनी  केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *