;
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी बुधवार ८ जुलै रोजी पदभार स्वीकारला.
यावेळी विरोधी पक्षाचे नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष नितीन धांडे नगरसेवक उल्हास भाऊ पगारे, आशिकखान शेरखान, दुर्गेश ठाकुर, राहुल बोरसे, साजिद शेख, सिकंदर खान, संता पहलेवान आदींनी नव नियुक्त मुख्याधिकारी यांची भेट घेऊन भुसावळ शहरातील समस्यांची माहिती त्यांना सांगितली.
त्यात रस्ते ,गटारी ,पाणी, पथदिवे, घाणीचे साम्राज्य, आदी विषयांवर चर्चा झाली.
भुसावळकरांना उत्तम सोयी व सुविधा देण्याला आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्याधिकारी डाके यांनी दिली.



