भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रभाग क्रमांक २४ मधील गायत्री नगरातील रहिवाशांनी, रविवार ५ जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव वृक्षारोपण करून साजरा केला.
गायत्री नगरातील ज्येष्ठ नागरीक द.रा.मोहरील, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, जयंत मोहरील, साधना मोहरील यांच्या हस्ते विविध वृक्ष लावण्यात आले. प्रसंगी कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सचे पालन करीत उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राहुल वाघ, प्रशांत ठाकूर, विशाल ठाकूर, सुशील कुलकर्णी, उदय शेटे, ऋतुजा मोहरील आदींची प्रसंगी उपस्थित होती. यावेळी नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा बॅनर लावला तसेच नागरीकांना वृक्षारोपण व पर्यावरण रक्षण व स्वच्छते विषयी जागरूक राहण्याचे आवाहन करीत ठाकुर यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला .



