
भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रेल्वे कर्मचारी तथा समाजसेवक स्व विजय गजमल चौधरी (छोटू ) यांच्या द्वितीय स्मृति दिना निमित्त सोमवार ६ जुलै रोजी गोरगरीबांना अन्नदान , धान्य वाटप व गरजुना जीवनावश्यक कीट वाटप केले .
शहरातील हातमजूर , अंधबांधव व गरजूंना अमोल चौधरीं व चौधरीं परिवारातर्फे सुमारे ३०० गरजु कुटुंबाना जीवनावश्यक वस्तुंचे किट यामध्ये गहु , तांदूळ , साखर , तेल , तिखट , हळद , साबण, हेअर ऑइल, यासह अन्नदान व संस्थेस धान्य देवून समाजपयोगी कार्य केले .
यानिमित्त डॉ बाबासाहेब स्मारकासमोरील शिवभोजन केंद्र येथे १२५ शिव भोजन थाळी जेवण देण्यात आले. शिवभोजन केन्द्राचे संचालक उमाकांत शर्मा यांचे सहकार्य लाभले .
तसेच येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था गेल्या ३ महिन्या पासून गरजुना व हातमजूराना आपल्या परिने धान्य व किराणा असलेल्या किटचे वाटप करत आहे, त्यांच्या या उपक्रमास देखील स्व. विजय चौधरी (छोटू ) यांचे स्मृती निमित्त संस्थेला ३० किलो तांदुळ मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे व उज्वला बागुल यांचे स्वाधिन करून संस्थेस सहकार्य केले.
यावेळी अमोल चौधरीं , अजय (मुन्ना) चौधरीं , उदय (पप्पू) चौधरीं, सनी चौधरी, श्रीमती इंदुमती चौधरीं , कल्पना चौधरीं, सौ वैशाली चौधरीं , वैष्णवी चौधरीं , स्वामी , समर्थ , यांचेसह चौधरीं परिवार उपस्थित होते .
कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वाचे भान राखून चौधरीं परिवाराने स्मृती दिनानिमित्त केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे



