भुसावळ (प्रतिनिधी )-
अंतर्नाद प्रतिष्ठानने लाॅकडाऊन काळात पहिल्या टप्यात ८० कुटुंबांना अाठवड्याचा किराणा वाटप केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यात १४५ कुटुंबाना आठवड्याचा किराणा वाटप केला आहे.माजी खासदार तथा आमदार भाजपा जिल्हा अध्यक्ष स्व.हरीभाऊ जावळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा किराणा गरजवंत कुटुंबाना वाटप करण्यात आला आहे. ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत अंतर्नाद प्रतिष्ठानने स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनात गरजूंची भूक भागवण्याचा प्रयत्न केला.बँजो पार्टी कलाकार (६१ कुटुंब ),बस स्टंड परीसर बेघर मजूर (२० कुटुंब ),दुकान कामगार (२५ कुटुंब),दिनद्याल नगर गवंडी मजुर (२० कुटुंब ),परराज्यातील मजुर ( १९ कुटुंब )
अशा १४५ कुटुंबांना दुसऱ्या टप्यात आणि एकूण २२५ कुटुंबाना किराणा वाटप करण्यात अाला. त्यात ४ किलाे गहू, २ किलाे तांदुळ, अर्धा किलाे तूरडाळ, १ किलाे तेल, चटणीची दाेन पाकिटे, १ साबण असे जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात अाले. प्रतिष्ठानचे पदाधिकारी व उपक्रमासाठी नियुक्त करण्यात अालेल्या समिती सदस्यांनी गरजूंच्या घरापर्यंत जावून जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
हे आहेत दातृत्वाचे धनी
अंतर्नादच्या या उपक्रमाला नितीन सोनवणे,अनिल झोपे,तेजेंद्र महाजन,योगेश बोरसे ,शेख फारुख ,दीपक नारखेडे,महादेव गरुड,योगेश सपकाळे,स्वाती कुलकर्णी,विजय नेहते,श्रद्धा अग्रवाल,प्राथमिक शिक्षक पतपेढी कर्मचारी वृंद ,राजेंद्र धाके ,लिलाधर वानखेडे,विजय चौधरी,गिरीश महाजन,हेमंत चौधर,के टी तळेले ,राजेंद्र सुरवाडे ,विजय निंभोरे,मिठाराम सरोदे ,शर्वरी सोनार ,जयश्री भारंबे ,दीपक टोके,हितेश सरोदे,सलीम तडवी यांचे सहकार्य लाभले.
एकता बँजो असोसिएशन अध्यक्ष दिपक सोनवणे –
संचारबंदीच्या काळात बँजो काम बंद असल्याने उपासमारीची वेळ आली होती. प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला मदतीसाठी वेळोवेळी निवेदन सुद्धा दिले पण आम्हाला कोणीही मदत केली नाही.पण अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून लहानशी का होइना आम्हाला जी मदत झाली ती लाख मोलाची मदत आहे.भुसावळ मधेच नाही तर जिल्ह्यातील ही पहिली संस्था असेल ज्यांनी बँजो पार्टी कलाकारांची अडचण समजून मदत केली आहे.त्यांनी आमची दखल घेतल्याबद्दल त्यांचे माझ्याकडून आणि उपाध्यक्ष विजय मेढे,कोषाध्यक्ष कडू पाटील,सचिव पिंकी मास्टर आणि सर्व कलाकारां कडून आभार.



