यंदा गुरुपौर्णिमा घरिच साजरी करा – संत गोपाल चैतन्य महाराज यांचे आवाहन ; ‘चैतन्य चैनल’ च्या माध्यमातून ऑन लाईन होणार दर्शन ;


रावेर (प्रतिनिधी )-
तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात वसलेल्या पाल या गावात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी स्थापित श्री वृन्दावनधाम आश्रम असून गुरुदर्शनाकरिता येथील श्री हरि धाम मंदिरात स्थापित पुज्य बापूजी चे समाधि स्थळ असून गुरुपौर्णिमेनिमित्त देशभरातून हजारो चैतन्य साधक परिवार तसेच भाविकांची उपस्थिति दरवर्षी लाभते. परंतु यंदा कोरोना च्या संकटामुळे पाल येथे ५ जुलै रोजी साजरी होणारी गुरुपौर्णिमा महोत्सव स्थगीत करण्यात आले असून यंदाची गुरुपोर्णिमा आपआपल्या घरिच साजरी करण्याचे आवाहन आश्रमाचे विद्यमान गादीपति श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांनी सोशल मिडियातून केले.
दरवर्षी गुरुपौर्णिमे निमित्त महाराष्ट्र सह मध्यप्रदेश मधून शेकडो किलोमीटर हुन हजारो चैतन्य साधक पायी दिंडी प्रवास करीत येत असतात परंतु त्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली असून तसेच परिवाराचे पाल सह कन्नड व मध्यप्रदेशातिल चारुकेश्वर , हरसूद,व शबरी धामआम्बा या आश्रमाचे मुख्य द्वार गुरुपौर्णिमेच्या दिवशी बंद करण्यात येणार आहे मात्र आश्रमातील साधु संताकडूंन सकाळी पादुका पूजन, त्या नंतर दहा वाजेला श्रधेय संत गोपाल चैतन्य महाराज यांचे सत्संग , आरती सोशल डिस्टिंग च्या माध्यमातून करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण ‘चैतन्य चॅनल’ च्या माध्यमातून ऑनलाईन (लाइव्ह प्रक्षेपण) दिसणार असुन भाविकानी घरिच राहून परिवारासह याचा लाभ घ्यावा व हा कार्यक्रम साजरा करावा असे श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज व समिति तर्फे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *