घरोघरी जाऊन प्रा.धिरज पाटील यांनी केले डेटॉल साबण वाटप ; कोरोना व्हायरस बाबत शिवसेनेची भुसावळात जनजागृती,


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनासंदर्भात शासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या असल्या तरी आता सर्वांना कोरोना सोबतच आपले पुढील आयुष्य घालवायचे आहे. शास्त्रज्ञ लससाठी प्रयत्नशील असून तो पर्यंत नागरिकांनी काळजी घेणे अतिआवश्यक आहे म्हणून शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी कोरोनाची लागण होऊ नये म्हणून माहिती पत्रक व डेटॉल साबणचे वाटप घराघरात जाऊन करत आहे. शिवसेनेचे ललित मुथा, देवेंद्र पाटील, धनराज ठाकूर, फिरोज तडवी, नबी पटेल, राजेश ठाकूर, हर्षल पाटील, मनोज पवार, शेख मेहमूद यांनी उपक्रमाचा शुभारंभ केला. भुसावळात श्रीनगर, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलोनी, रेल दुनिया, भुसावळ हायस्कूल परिसर, विद्यानगर, मुक्ताई कॉलनी, अयोध्या नगर, शालीन पार्क, महालक्ष्मी नगर, गणेश कॉलनी परिसरात जनजागृती केली.
नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे, मास्क कसे व का वापरावे, हात कसे धुवावेत, नागरिकांनी शासनाने दिलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, सोशल डिस्टन्स पाळावे अशी कोरोना नियंत्रणाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. अमोल पाटील, तुषार करंदीकर, कृष्णा सपकाळे, निखिल चौधरी, कैलास पाटील, नितीन लोखंडे, किशोर कोळी, शुभम दराडे, दीपक वाघोदे, शुभम पाटील, धनेश पाटील, सागर कोळी, प्रीतम पाटील, चेतन पाटील, विशाल ठोके, शंतनू पाथरवट, किशोर पाटील यांनी सहकार्य केले.
घराघरात माहिती पोहचवण्याचा प्रयत्न: प्रा.धिरज पाटील
कोरोना व्हायरसने जगभरातील लोकांना विळखा घातला असतांना भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या कोरोना विषाणूने भुसावळात ही शिरकाव केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती असलेले पत्रक डेटॉल साबणासोबत वाटप करण्यात आले असून, त्या माध्यमातून थेट घराघरात माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘नागरिकांनी घाबरू नये, काळजी घ्यावी व स्वतः सह आपल्या परिवाराला तसेच इतरांनाही वाचवण्याचे प्रयत्न केले जावेत,’ असे आवाहनही प्रा.धिरज पाटील यांनी केले आहे.

परिसरातील नागरिकांनी केले कौतुक ;
सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला आळा घालण्यासाठी शासन तथा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स, पोलीस जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे समाजात या व्हायर्सबाबत जनजागृती व्हावी म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून जनजागृती अभियान राबवण्यात आले. पहिल्या दिवसापासून प्रा.पाटील यांनी कौतुकास्पद कार्य करीत नागरिकांना अनेक माध्यमातून कोरोना विषयक माहिती दिली. नागरिकांनी सूचनेनुसार पालन केले व परिसर कोरोनामुक्त राहिला आहे असे नागरिकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *