वंजारी महासभा जिल्हा महिला अध्यक्षपदी संगीता भामरे यांची निवड

भुसावळ (प्रतिनिधी )
येथील महिला सामाजिक कार्यकर्त्‍या व वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षा संगीता राजेंद्र भामरे यांची वंजारी महासभा महाराष्ट्रच्या जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती विभागीय अध्यक्ष शिवाजी आव्हाड मुंबई व राज्‍य संपर्क प्रमुख खंडेश्वर मुंडे यांनी केली आहे.
सदर नियुक्तीबद्दल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे,विद्यासागर खरात, निलेश जाधव,प्रमोद निळे, दिपाली निळे,आशाताई, आरतीताई, सुमनताई आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *