भुसावळात श्री चिंतामणी मोरया फाऊंडेशनच्यावतीने आर्सेनिक अल्बम -३० या होमियोपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप ;

भुसावळ ( प्रतिनिधी )-
येथील श्री चिंतामणी मोरया फाऊंडेशनच्यावतीने तसेच डॉ. काबरा , लाईफ-लाईन हॉस्पिटल
यांचे सौजन्याने शहरातील राम मंदिर वार्ड भागातिल कुटुंबियाना कोरोना संसर्गजन्य आजाराच्या स्थितीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम -३० या होमियोपॅथिक गोळ्यांचे शनिवार २३ मे पासून सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत वितरण करण्यात येत आहे .
आयुष मंत्रालय, भारत सरकारने अर्सेनिक अल्बम हे औषध कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सुचवलं असून या गोळ्यांचा एक डोस सकाळी उपाशी पोटी पाण्यात विरघळून असे ३ दिवस घ्यावयाचे आहे. यामुळे प्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होत आहे याकरीता श्री चिंतामणी मोरया फाऊंडेशन व डॉ. काबरा , लाईफ-लाईन हॉस्पिटल, कोर्ट स्क्वेअर, जी. एस. ग्राउंड समोर, जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने
येथील चिंतामणी मंडप , श्री राम मंदिर वार्ड ,येथे सकाळी डॉ लक्ष्मीकांत नागाला, डॉ. शीतल चोरडिया, डॉ सुशील पाटील,
सनी चोरडिया , यशवंत चौधरी – अध्यक्ष , कुलदीपसिंग पाटील – उपाध्यक्ष , जितेंद्र जोशी – सचिव
दलजीतसिंग चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू ब-हाटे , तसेच श्री चिंतामणी फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोफत गोळ्यांचे वाटप करण्यात आले . यावेळी शासनाच्या नियमांचे सोशल डिस्टनसिंग , सैनीटायझर , व मास्क आदीं नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले . या उपक्रमाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करून आभार मानले .
चिंतामणी मंडप, श्री राम मंदिर वार्ड, भुसावळ.
मोबा.नं. ८८८८८७६९२५,
९५४५८८६२९९, ८९८३७०६०१०, ८८८८८७६९२१
तसेच डॉ. काबरा, लाईफ-लाईन हॉस्पिटल, कोर्ट स्क्वेअर, जी. एस. ग्राउंड समोर. ०२५७२२२९९४९, ९९७५७७५८४९ येथे संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *