भुसावळात शिवभोजनच्या माध्यमातून शेकडो गरजुना मिळतोय आधार ; सेवाव्रती शिवसैनिक नमा शर्मा यांचे कार्य ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात येथील रेल्वे स्टेशन परिसरात शिवसेनेतर्फे शिवसैनिक उमाकांत (नमा) शर्मा, यांनी शिवभोजन सुरु केले आहे. यामाध्यमातून गेल्या २५ दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गरीबाना ५ रूपयात जेवण देण्यात येत आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरात रेल्वे स्टेशन परिसरात शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले असून यासाठी तहसीलदार दीपक धिवरे, नगरपालिका मुख्याधिकारी सौ करुणा डहाळे यांनी शिवभोजन निवड समितीच्यावतीने जागेची पाहणी केली होती त्यानुसार भुसावळ येथे रेल्वे स्टेशन परिसरात शिवसैनिक समाजसेवक उमाकांत (नमा)शर्मा यांची निवड करण्यात आली होती. जेष्ठ शिवसैनिक उमाकांत(नमा)शर्मा कट्टर शिवसैनिक असून बाळासाहेबांच्या शिकवणी नुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असा उद्देश्य डोळया समोर ठेऊन मागील २५ दिवसा पासून लॉक डाउन मध्ये सरकारच्या निर्णया नुसार ५ रूपयात २ चपाती, वरण, भात , भाजी असे दररोज सुमारे १५० ते २०० लोकांना जेवण देत आहे. एवढेच नव्हे तर नमा शर्मा स्वखर्चाने गरीबाना एक दिवस मिठाई, बुंदीचे लाडू, आमरस, मठ्ठा असे काही ना काही पदार्थ देत आहे . गरीबांची सेवा ,त्यांचे आशीर्वाद , जेवण मिळाल्याव बद्दल त्यांचे चेहऱ्यावरील आनंद हिच सर्वात मोठी पावती असल्याचे नमा शर्मा यावेळी म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *