दलित चळवळीतील ज्‍येष्‍ठ नेते हंसराज पगारे कालवश.

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील दादासाहेब रुपवते हौसिंग सोसायटीचे आधारस्तंभ तसेच भुसावळात ज्यांनी ८०च्या दशकात जळगाव जिल्हयात दलीत पँथर स्थापन करुन झंझावात निर्माण केला असे आंबेडकरी चळवळीचे निष्ठांवत कार्येकर्ते,भारतीय बौध्द महासभेवर शेवटच्या क्षणापर्यत निष्ठा असलेले हंसराज पगारे यांचे २७ एप्रिल सोमवार रोजी वयाच्या ८२ वर्षी वृध्‍दापकाळाने निधन झाले.
सन१९७३ मध्ये भुसावळ येथील आगवाला चाळ येथे हंसराज पगारे हे दलित पँथरचे जळगाव जिल्हाध्यक्ष होते. त्याच्या अध्यक्षते खाली दलित पँथरची जाहीर सभा आयोजित केली होती.या सभेला दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ ढाले,प्रा.अरूण कांबळे,नामदेव ढसाळ आदींचे जोशपूर्ण भाषणे झाली होती. भुसावळ येथे दलित पँथरच्‍या वतीने मोर्चे,आंदोलने,सभा, विद्रोही कवि कट्टा,गट चर्चा सुरू झाल्या त्यावेळी ख-या अर्थाने चळवळला परिपक्वता आली होती. भुसावळ हे शाहु,फुले व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आगार होते या चळवळीला योग्य असे मार्गदर्शन हंसराज पगारे करीत होते.
५डिसेंबर १९७९रोजी सायंकाळी भुसावळ येथुन दलित पॅन्थरच्या बॅनर खाली हंसराज पगारे यांच्या नेतृत्वाखाली प्रेमसागर चाबुकस्वार,राजु यशोदे, रमेश साळवे,रमेश इंगळे,रमेश मकासरे,शाम देशमुख,मोहन निकम,प्रभाकर वासनिक,जोगदंड बंधु,प्रा.गौतम निकम,गंगावणे बंधु,अशोक भालेराव,बहिरूणे, लालाजी ढिवरे,राजु पांडव,सिध्दार्थ सोनवणे,एम.आर तायडे,अॅड.सपकाळे आदी मान्यवर सोबत मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीच्या लाँगमार्च मध्ये सहभागी झालो.
६डिसेंबर १९७९रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सर्वांना अटक करून हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
११डिसेंबर १९८८मध्ये हंसराज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय भुसावळची स्थापन करण्यात आली. तेथे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात असत.
शेवटी ते दि.२३फेब्रुवारी २०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्राउंड,भुसावळ येथे बौध्द धम्म परीषद असल्याने तेथे व विमल कीर्ती प्रकाशनच्‍या स्टॉलवर रामराज परदेशी,विष्णू भारूळे,गौतम निकम सोबत आले होते.त्‍यांच्‍या पश्‍चात पत्‍नी,२ मुले,मुलगी,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *