भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरांमध्ये समता नगर व सिंधी कॉलनी या भागात लागोपाठ दोन रुग्न कोरोना बाधित आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे . या पार्श्वभूमिवर समता नगर व सिंधी कॉलनी या परिसरास सुमारे दीड किलोमीटर परिसर प्रशासनाने सिल केला आहे . या सील केलेल्या भागांमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरीता या परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातील अशी माहिती भुसावळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी दिली.
शासकीय विश्राम गृह येथे सोमवार रोजी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीस डहाळे आलेल्यां असता यावेळी माहिती दिली .तसेच नागरिकांनी घराबाहेर निघू नका , मास्क वापरा , डिस्टन्स ठेवा याच बरोबर कायदयाचे नियम पाळावे असेही आवाहन मुख्याधिकारी ङहाळे यांनी केले आहे .



