लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे द्वारे १८९ टन वैद्यकीय वस्तू वाहतूक;भुसावळ विभागातून १९०० टन पेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड-१९ विरूद्धच्या अखंड लढाईत मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात १८९ टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने देशभरातील वैद्यकीय वस्तूंची अखंड वाहतुक सुनिश्चित करते. वेळापत्रका नुसार १०० पार्सल गाड्या यापूर्वीच चालविल्या असून ११० गाड्यांचे वेळापत्रकानुसार चालविण्याचे नियोजन आहे. या पार्सल गाड्यांमधून मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून १९०० टन पेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. त्यामध्ये १८९ टन आवश्यक औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. यात ५४५ टन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
देशातील कोरोना विषाणूचा होणारा प्रतिकूल परिणाम आणि त्याचे दुष्परिणाम हाताळण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी मध्य रेल्वेने वेळोवेळी पार्सल सेवेद्वारे औषधे, रुग्णालयातील वस्तू आणि इतर वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवला आहे.
मध्य रेल्वे संकटांच्या वेळी मानवी जीवनास स्पर्श करते. नुकतीच विशेष उपचारासाठी बेळगाव येथील चार वर्षाच्या मुलाला पुण्याहून होमिओपॅथिक औषधाची आवश्यकता होती जे रेल्वे ट्रेनच्या गुड्स गार्ड ऑफ माध्यमातून नातेवाईकांच्या स्वाधीन केले गेले. दुसर्‍या घटनेत, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मदतीसाठी केलेल्या आवाहना नुसार नागपूर विभागातील पार्सल सेक्शनने लुधियाना येथे एका गरजू व्यक्तीचे औषध योग्य प्रकारे पोचवविणे सुनिश्चित केले असल्याचे मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांनी मुंबई कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *