भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे तर्फे कल्याण व चांगसारी दरम्यान वैद्यकीय, भोजन इत्यादी आवश्यक वस्तू पाठविण्यासाठी २४ एप्रिल २०२० रोजी पार्सल ट्रेन चालवणार आहे.
जर संपूर्ण पार्सल ट्रेन एखाद्या पार्टीद्वारे सुरूवातीच्या ठिकाणी लोड केली तर पार्सल गाडी गंतव्यस्थानावर पोचण्यासाठी मधल्या स्थानकांवर न थांबवता हि ट्रेन चालविली जाऊ शकते. कोणत्याही गंतव्यस्थानासाठी पार्टीद्वारे पूर्ण पार्सल ट्रेनची मागणी केल्यास, सेवा प्रदान करण्यासाठी मध्य रेल्वे तत्परतेने कार्य करेल.
या गाडीमध्ये कोणत्याही प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही. याचा तपशील वळ व स्थानक पुढीलप्रमाणे आहे , यात
००११७ पार्सल ट्रेन कल्याण येथून २४ एप्रिल २०२० रोजी ८.३० वाजता सुटेल व इगतपुरी (११.०० / ११.१०); भुसावळ (०३.३० / ०४.), नागपूर (११./ ११.३०), दुर्ग (३.५० / ३.५५), बिलासपूर (७ / ७.०५), झारसुगुडा (८.४० / ८.४५); टाटानगर (०२.५५ / ३ ), डानकुनि (०७.२० / ०७.५०), मालदा टाऊन (१.२० / १.३०); न्यू बोंगाईगांव (११.०० / ११.०५) आणि २७ एप्रिल २०२० रोजी ३ वाजता चांगसारीला पोहोचेल.
००११८ पार्सल ट्रेन दिनांक २७ एप्रिल २०२० रोजी ११.३० वाजता चांगसारी येथून सुटेल व न्यू बोंगाईगांव (४./ ०४.०५), मालदा टाउन (२.१० / २.२०), डानकुनि (८.४० / ८.५०) , टाटानगर (०१. / ०१.०५), झारसुगुडा (०५.०५ / ०५.१०), बिलासपूर (०८.२० / ०८.२५) , दुर्ग (११ / ११.०५); नागपूर (३.३० / ४ ), भुसावळ (११.२० / ११.५०); इगतपुरी (०४.५० / ०५.) आणि ३०एप्रिल२०२० रोजी ०७.३० वाजता कल्याण येथे पोहोचेल.



