रमजान काळात नियमांचे काटेकोर पालन करावे – रामकृष्ण कुंभार ; रमजान निमित्त भुसावळ तालुक्यातील पोलिस पाटलांची बैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणू रोखण्याकरीता सुरु असलेल्या लॉक डाऊन व संचारबंदी सुरु आहे त्यात येत्या २५ एप्रिल रोजी पासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महीना सुरु होत आहे म्हणून या पार्श्वभूमीवर तसेच भुसावळ तालुक्यात तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची आज बुधवार २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये सोशल डिस्टन्स इन मास्क,याबाबत तंतोतंत पालन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आगामी काळात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू होत असल्याने त्यांना मशिदीमध्ये नमाज पठण न करता आपल्याच घरीच नमाज पठण करावे .तसेच सोशल डिस्टन्स चे पालन करावे, तसेच रमजान काळात नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करून कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी रमजान महिन्यांमध्ये नियमित नमाज पठण तसेच तरावीह आदी अनुषंगाने एकत्र न येण्याबाबत महाराष्ट्र शासनयांच्या जी .आर. मधील सूचना देऊन मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक गावातील अडचणी बाबत चर्चा केली .
यावेळी बैठकीस तालुक्यातील खडका येथील पोलिस पाटिल सुरतसींग पाटिल,कन्हाळा रेवसींग पाटिल, शिंदीचे अतुल पाटिल, यांच्या सहतालुक्यातील पोलिस पाटिल उपस्थितत होते.
दरम्यान तालुक्यातील मौलाना यांना स्वतः भेटून माहिती देऊन १४९ अन्वये नोटीस व शासनाचे आदेशाच्या प्रती देण्यात आल्या आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *