भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता बाजारपेठ पोलीस व पोलीस ठाण्यात येणा-या नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब आॅफ भुसावळ राॅयल्स तर्फे रायझिंग फाऊंडेशन निर्मित व उपाध्यक्ष सरफराज तडवी यांच्या सौजन्याने सॅनिटायझेशन चेंबर बाजारपेठ पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या हस्ते भेट देवून कार्यान्वीत करण्यात आले.
पोलीस ठाण्यात येणा-या प्रत्येकावर या मशीनने सॅनिटाइज होणार आहे.
.याप्रसंगी रोटरी क्लब आॅफ भुसावळ राॅयल्सचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक अरुण मांडाळकर,सचिव राजेंद्र यावलकर,गणेश फेगडे तुषार झांबरे,हर्षल वानखेडे, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.



