नवी मुंबईत गरजुंना धान्य वाटप

नवी मुंबई :
संचारबंदीच्या काळात गोरगरीब लोकांचे होणारे हाल आणि उपासमार टाळण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार गणेश नाईक यांच्या विशेष सहकार्या मुळे संपूर्ण जुईनगर परिरातील लोकांना 15 दिवस पुरेल इतके धान्य 9 एप्रिल पासून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाचा कार्यक्रम होत असला तरी सोशल डिस्टंसिंगची काटेकोर अंमलबजावणी करत पहिल्या दिवशी 300 कुटुंबाला किट वाटप करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबईमध्ये सध्या संचारबंदी सुरू आहे शहरात विविध वसाहती वर अनेक गोरगरीब मजूर लोक हाताला काम नाही त्यामुळे अन्नधान्य नसल्याने उपासमारीला सामोरे जात आहेत , शहरातील आशा लोकांचा शोध घेऊन नवी मुंबई भाजपा महामंत्री डॉ राजेश पाटील, माजी नगरसेवक तथा परिवहन सदस्य काशिनाथ पाटील यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गोरगरीब आणि हातावर पोट असणारे 300 कुटुंबाला दर रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किमान धान्याची किट देण्याचा निर्णय घेऊन स्वतः खर्चातून हे धान्य , १५ दिवस पुरेल एवढे धान्य या किट मध्ये उपलब्ध करून देण्यात पहिल्या व दुसऱ्या टप्यात वाटप करण्यात आले आहे , यावेळी परिवहन सदस्य काशिनाथ पाटील यांच्यासह सुरेश पाटील, जगदीश मढवी, शामनाथ गावंड, अर्जुन पाटील, रामनाथ ठाकूर, बबन पाटील व इतर कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. सोशल डिस्टनसिंग पाळून धान्य वाटप करण्यात आले होते , गरजू लोकांना त्यांच्या तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधल्या नंतरच त्या ठिकाणी प्रवेश देऊन एक एक करत एक मीटर अंतरावर बसवण्यात आले ,लवकरच तिसऱ्या टप्यात सुद्धा अन्नधान्य वाटप वाटप केले जाणार असल्याचे परिवहन सदस्य काशिनाथ पाटील यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *