सावदा (प्रतिनिधी )-
कोरोना व्हायरस या महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्यास्थितीचा देशासह महाराष्ट्र राज्य मुकाबला करीत आहे.यात योगदान म्हणून सावदा पालिकेने एक कोटी रुपये निधी मुख्यमंत्री सहायता निधी साठी द्यावे असे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना गुरुवार 9 एप्रिल रोजी दिले.
कोविड 19 या आजाराचा मुकाबला करण्यासाठी देश व राज्य हे होरपळून निघाले आहे. लॉक डाऊन मूळे सर्वच उद्योग धंदे बंद आहेत.त्यामुळे शासनाकडे कर रूपाने कोणतेही महसुली उत्पन्न येत नाही आहे.मात्र उपचार व गोर गरीब लोकांना जेवण देणे,रेशनवर धान्य वाटप साठी अतिरिक्त आर्थिक खर्च करावा लागत आहे. यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधे मदत करणे खूप आवश्यक बनले आहेत. सावदा पालिकेत आज मितीस विविध अनुदान, योजना यातून प्राप्त झालेला निधी हा एकूण 13 ते 14 कोटी रुपये उपलब्ध आहेत.हा निधी शासनानेच दिला आहे.पण आज शासनच अडचणीत आहे.अश्या संकट वेळी पालिकेने शासनाला अर्थिक मदत केली पाहिजे.विकास हा पुढेही होत राहील.पण आज विकास कामा ऐवजी माणूस जगविणे हे महत्वाचे आहे.याचा विचार करून पालिकेने निर्णय घेऊन मुख्यमंत्री सहायता निधी मधे एक कोटी रुपये द्यावे असे वानखेडे यांनी सांगितले.



