फैजपूर (प्रतिनिधी )-
कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला फैजपुर स्वामीनारायण गुरुकुल संस्थेकडून एक लाख 11 हजार 111 रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रसंगी सावदा स्वामीनारायण गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रकासदासजी यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंधुभाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून स्वामीनारायण गुरुकल संस्थेकडून 1 लाख 11 हजार 111 रुपये देणगी देण्यात आली असल्याचे सांगितले



