भुसावळ (प्रतिनिधी)
शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फाैजदार यांनी दिनांक ४ एप्रिल रोजी येथील पत्रकारांना व छायचित्रकार यांच्या आरोग्याची काळजी घेवून त्यांना मास्क वाटप केले .
पत्रकार व छायाचित्रकार हे सुद्धा अहोरात्र लॉक डाऊन च्या काळात व कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कार्य करीत आहे .तसेच सदैव पोलीस व पत्रकारांचे नाते हे चोली दामन का साथ असल्याप्रमाने आहे असे सतत म्हणणारे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण यांनी पत्रकारांसाठी मदतीचा हात पुढे करून मास्क वाटप केले.
संचारबंदी सुरू असून पोलीस अधिकाऱ्यांची कारवाई सुरू आहे.ती संकलनासाठी पोलीस स्टेशनला पत्रकार येतात.त्यांच्या तोंडाला संचारबंदी दरम्यान रुमाल बांधलेला असतो.कदाचित दुकानात मास्कचा तुटवडा आल्याने किंवा विक्रीसाठी शिल्लक नसावे यामुळे पत्रकार रुमाल लावत असावे.असा विचार बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फाैजदार तस्लिम पठाण यांच्या मनात आला व त्यांनी सर्व पत्रकार पोलीस स्टेशनला बोलावून चांगल्या दर्जाचे तोंडाला लावण्यासाठी मास्क वाटप केले.



