तालुक्यातील खडका गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी व उपाय सुरु

खडका (वार्ताहर ) –
येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून गावात कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाहि यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये सर्वप्रथम गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली, त्याचप्रमाणे आजपासुन गावात येणाऱ्या फेरीवाल्यांसह गावात येणाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांना गावातील परिसरात येण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व पान टपरी बंद करण्यात येत आहे. आजपासुन गावातील चौका चौकात संचारबंदिचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिक्षक गजानन राठोड तसेच तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील दहा स्वयंसेवकांची नियुक्ती करुन गावातील प्रत्येक चौकांमध्ये दोन दोन जणांची नियुक्ती करुन त्यांना गस्त घालण्याचे सांगण्यात आले आहे तसेच त्यांच्या सोबत ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुध्दा गस्त घालणार आहे .
बाहेरील गावातील फेरीवाल्यांना गावात येण्यास बंदी -सरपंच सौ पद्माबाई चौधरी
बाहेरील गावातील फेरीवाल्यांना गावात येण्यास बंदी
करण्यात आली असून जे लॉक डाऊन मुळे अडकले आहेत त्यांची चौकशी करावी, कोरोनाचे पार्श्वभूमिवर व संचारबंदीचे काटेकोर आदेशाचे पालन नागरिकांनी करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे विनंती व आवाहन सरपंच सौ पद्माबाई चौधरी यांनी केले.
यावेळी सरपंच सौ पद्माबाई चौधरी,उपसरपंच अनिल महाजन, ग्रा.प.सदस्य भैय्या महाजन ,श्यामसींग पाटिल उपसरपंच धना महाजन यांच्या सह कर्मचारी व दहा स्वयंसेवक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *