खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते भुसावळ तालुक्यातील गरजूंना आयआरसीटीसीच्या माध्यमातून अन्नदान;

भुसावळ ( प्रतिनिधी )
कोरोना व व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे गरजू व निराधार लोकांना रोजगार नसल्याने खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते तालुक्यातील गरीब गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले.
देशभरात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून खा. रक्षा खडसे याच्या वतीने आयआरसीटीसीच्या माध्यमातून दि. १४ पर्यंत शहर व तालुक्यातील दीड हजार गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे. ती संख्या आता दोन हजारांवर करण्यात येणार आहे. दि. ५ रोजी गर्दी टाळून प्रातिनिधीक स्वरुपात भुसावळात अन्नदान करण्यात आले. यावेळी आ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.डॉ.सुनील नेवे, प्रमोद नेमाडे, आनंदा ठाकरे, गिरीष महाजन, शहराध्यक्ष गिरीष नेमाडे, पवन बुंदेले आदी उपस्थित होते.
यावेळी खा. रक्षा खडसे यांनी, केंद्र सरकार कोरोनाबाबत दक्षता घेत असून नागरिकांनीही लॉक डाऊनमध्ये घरामध्येच राहावे जेणेकरून हा प्रादुर्भाव लवकरात लवकर आपण टाळू शकू. कोरोनाचा प्रादुर्भावात जे लढा देत आहे अशा डॉक्टर नर्स प्रशासनाचे कर्मचारी पोलीस यांच्या सुरक्षेतेसाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे याबाबत केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली असून राज्याचे मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र व्यवहार करणार असल्याचे खा.रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी अन्नदान उपक्रमात सहभागी कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *